#वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्याहस्ते सत्कार!
#वयाच्या ७४ व्यावर्षी गोविंद किरमिटेचा सायकलच प्रवास!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूरातील विश्व हिंदू परिसद अध्यक्ष व समाज सेवक गोविंद किरमीटे यानी आपल्या वयाच्या ७४ व्या वर्षी सुध्दा सायकल वरूनच प्रवास करत असतात. याबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधुन खानापूर वकील संघटनेच्यावतीने सायकलस्वार गोविंद किरमिटे यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर आर.घाडी म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञान युगात प्रत्येक जन दुचाकी अथवा चार चाकी वाहनासाठी घरा बाहेर पडत नाही.
मात्र खानापूरातील एक अवलिया गोविंद किरमिटे वयाच्या ७४ व्या वर्षी सुध्दा सायकल वरून प्रवास करतात.त्यामुळे तरूणाना लाजवेल अशी त्याची प्रकृती आहे.या सायकल प्रवासामुळे त्याना बी.पी.,सुगार अशा रोगाचा कधी त्रास नाही.
तेव्हा आजच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने सायकल वरून प्रवास केला. तर आरोग्य चांगले राहील.कोणताच रोग जवळ येणार नाही.तेव्हा प्रवासासाठी सायकलचा वापर करावा.व आरोग्य सदृढ ठेवावे.असे आवाहन केले.
यावेळी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. ईश्वर आर.घाडी यांच्याहस्ते सायकलस्वार गोविंद किरमिटे यांचा शाल,पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी जेष्ठ वकील अँड.एम.ए.पाटील, अँड.एस.एन.लोटूकर,अँड.जी.एम.देसाई,
अँड.आर.एन.पाटील, अँड. नविन सुनगार,अँड. उप्पीन ,अँड. आय.बी.लंगोटी,अँड.प्रताप गद्दीकेरी,अँड.पी.वाय.पडीपाटील,
अँड.विजय हिरेमठ, समाज सेवक जयंत तिनेईकर, संदिप शमले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वानी गोविंद किरमिटेच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या.