” #स्वामी विवेकानंद पदवीपूर्व काॅलेजात फ्रेशेट्स डे. युनियन व जमखाना उदघाटन,शपथ विधी कार्यक्रम सपंन्न!”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
विद्यार्थी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द ,ध्येय ठेवून अभ्यास केला पाहिजे.अभ्यासाबरोबर खेळ व इतर अँक्टीव्हीटीज मध्ये भाग घेऊन यशस्वि झाले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्याना काॅलेजची पहिली पायरी जीवनात फार महत्वाची असते. पदवीपूर्व काॅलेजची दोन वर्षे ही जीवनाला कलाटणी देणारी असतात. या दोन वर्षात तुम्ही चांगला अभ्यास करून यशस्वी झाला तर पुढील शिक्षण तुमचे सोपे जाईल. यासाठी स्वामी विवेकानंद पदवी पूर्व काॅलेजमध्ये कला , वाणिज व सायन्स विभागाची सुरूवात करण्यात आली आहे.यानिमित्त आज काॅलेज मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पाडला.यावेळी संस्थेचे चेअरमन अँड.चेतन मणेरीकर यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते अध्यक्षपदावरून बोलताना केले.
यावेळी व्यासपिठावर संस्थेचे सेक्रेट्ररी सुहास कुलकर्णी ,माजी चेअरमन विद्यामान संचालक जयंत तिनेईकर,प्राचार्य पी के चापगांवकर,उपप्राचार्य एस एस पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक उपप्राचार्य एस.एस.पाटील यानी केले. तर उपस्थितांचे स्वागत प्राचार्य पी. के. चापगांकर यानी गुलाब पुष्प देऊन केले.
उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व काॅलेजच्या मंत्री मंडळ पदी निवड झालेले विद्यार्थी जनरल सेक्रेटरी कु. रेवती एम.पाटील ,लेडीज प्रतिनिधी ममता पी कोंडे,सांस्कृती प्रतिनिधी विनायक आर.नायकर,क्रिडा प्रतिनिधी किरण गोरल, तसेच सी.आर.कला विभाग कशब नाईक, वाणिज्य विभाग मयूर गावडे, विज्ञान विभाग नैतिक पाटील , सी आर महिला प्रतिनिधी वाणिज्य विभाग वैभवी आर.परमेकर, सायन्स विभाग अदिती पाटील यांची निवड झाल्याबद्दल प्रा.मेहश मुरगोडकर, यानी शपथ देऊ केली.त्यानंतर त्याचा पाहुण्यांच्याहस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य पी.के.चापगावकर, उपप्राचार्य एस एस पाटील, संस्थेचे सेक्रेटरी सुहास कुलकर्णी व संचालक जयंत तिनेईकर यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शनपर विचार मांडले.
यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग,पालक वर्ग,विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुनिता लाड,प्रा. निखिता पाटील यानी केले.
तर आभार प्रा.महेश गुळनायर यानी मानले.
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व काॅलेजात आज सोमवारी दि.११ रोजी सकाळी ११ वाजता फ्रेशेट्स डे. युनियन व जमखाना उदघाटन, काॅलेज मंत्री मंडळाच्या शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अँड.चेतन मणेरीकर असतील.तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विकास वर्दे, सुहास कुलकर्णी सेक्रेटरी ,प्राचार्य पी के चापगावकर आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणावी.असे आवाहन प्राचार्य पी के चापगावकर यानी केले आहे.