#दोन आरोपीना बंदिस्त!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात दोन ठिकाणी झालेल्या घर फोडी प्रकरनात दोन चोरट्याना बंदिस्त करून त्याच्याकडून ८५ ग्राम सोने आणि चांदी असा ऐवज जप्त करण्यात खानापूर पोलिसाना यश आले आहे.
या चोरी प्रकराणात आरोपी दिपक उर्फ रोहन मातंगी मुक्काम हलकर्णी (ता.खानापूर) , सध्या मुक्काम मच्छे (ता.बेळगाव), दुसरा आरोपी शिवनागय्या मुतय्या उमचगीमठ मुक्काम गुजमागडी ( ता.रोन) अशी त्यांची नावे आहेत.
या आरोपींच्यावर गुन्हा दाखल करून त्याना न्यायालयीन रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी की ,दि.२१ एप्रिल रोजी खानापूर शहरातील मराठ मंडळ जवळील रेश्मा क्षीरसागर यांच्या बंद घराचा कुलूप तोडून चोरी झाली होती.यावेळी चोरट्यानी सोने ,चांदी लाबविली होती. या प्रकराणातील ६० ग्राम सोन्याचे दागीने पोलिसानी आरोपिंच्या जप्त करण्यात आले आहे.
दुसर्या चोरी प्रकारणात खानापूर शहरातील रेणूका किणगी यांच्या घरी दि.७ जुन रोजी चोरी झाली होती. या प्रकराणात ही पोलिसानी या आरोपिंच्या कडुन २६ ग्रॅम सोने , तसेच २१० ग्रॅम चांदीचे दागीने जप्त करण्यात यश आले आहे.
सदर प्रकरणाचा छडा जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ पोलिस अधिकार्याच्या मार्गदर्शनानुसार खानापूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी,पोलिस उपनिरीक्ष श्री बिरादार पोलिस उपनिरीक्षक निरंजन तसेच पोलिस डी.जे. येळगार,आय.जे.काद्रोळी , श्री कामकरी इतर पोलिस पथकाने ही कारवाई करून चोरीचा छडा लावण्यात यश मिळविले आहे.