संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कामतगा ( ता.खानापूर ) येथील शेतकरी तुकाराम पाटील यांच्या मालकीच्या ८ महिण्याच्या गाभन म्हशीचा अज्ञात रोगाने केवळ ४८ तासात तडफडुन मृत्यू झाला.
यावेळी जनावरांच्या डाॅक्टर टीमने म्हैस वाचविण्यास अथक प्रयत्न केले. मात्र म्हैस वाचू शकली नाही.
ही घटना सोमवारी दि.११ रोजी घडली असुन शेतकर्याचे ५० ते ६० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की कामतगा येथील तुकाराम पाटील यांची रविवारी पहाटेपासुन अचानक गोट्यात पडुन तडफडू लागली.लागलीच सरकारी डाॅक्टर श्री चरंतीमठ याना बोलविण्यात आले .
औषधोपचार करण्यात आले. मात्र रोगाचे निरसन झाले नाही.परंतु उपचारानंतर ही म्हैस जास्तच तडपडू लागली. त्यातच म्हैशीची मृत्यू झाला. यावेळी डाॅक्टरशी संपर्क करून माहिती घेतली असता रोगाचे निदान होणे कठीण झाले आहे.
सुरूवातील टिट्यानस रोगाची लक्षणे दिसु लागली. शिवाय कुत्रा चावल्याने ही अशीच लक्षणे दिसुन येतात.त्यामुळे उपचार करणे कठीण होते. कोणत्या अज्ञात रोगाने म्हैस दगावली हे सांगता आले नाही. तेव्हा शेतकर्यानी समतोल आहाराबरोबर सर्व प्रकारच्या जनावराना लसी घेणे महत्वाचे असे मत डाॅक्टर सांगीतले.
शेतकर्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी!
कामतग्याचे गरीब शेतकरी तुकाराम पाटील याच्या गाभन म्हैशीचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याने त्याना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा सरकार कडुन शेतकर्याला नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी कामतगा गावच्या शेतकरी व गावकर्यातुन होत आहे.