#खानापूर नगरपंचायतीचा आदेश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराची व्याप्ती दिवसेदिवस वाढत आहे.शहरात स्वच्छता ठेवताना नगरपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागते.यातच खानापूर शहरातील नागरीक घरातील कचरा प्लॅस्टीक पिशवीत घालुन थेट रस्त्यावर, कोपर्यात टाकुन जात आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर ,चौकात घाणेचे साम्राज्य पसरले आहे.
यानिर्भंद घालण्यासाठी नगरपंचायतीने जो नागरीक रस्त्यावर ,कोपर्यात तसेच उघड्यावर कचरा टाकेल.त्या नागरीकाला ५०० रूपयाचा दंड नगरपंचायत आकारण्यात येत आहे.
तेव्हा नागरीकानी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घरचा कचरा रोज सकाळी कचरा गाडीत द्यावा. उघड्यावर टाकू नये. अन्यथा ५०० रूपयाचा दंड आकाराला जाईल .असे आवाहन खानापूर नगरपंचायतीने केले आहे.