संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हबनहट्टी ( ता.खानापूर ) येथील स्वयंभू मारूती मलप्रभा तीर्थक्षेत्र येथे सोमवारी दि १८ रोजी सकाळी ११ वाजता विविध विकास कामासाठी महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजुर केलेल्या दीड कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण कसर्लेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी भक्तनिवासाचे व घाटाचे भूमिपूजन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर ,खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर,एम एल सी चन्नराज हट्टीहोळी तसेच युवा काॅग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला शेखरगौडा कुरंदगी,युवराज कदम ,किरण गावडे,मनोहर बेळगावकर,सरस्वती भरणकर तसेच याभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.