#२१ वर्षानंतरचा योग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील आंबेडकर गार्डन जवळील गणेश मंदिरात श्रावण महिण्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग तब्बल २१ वर्षानंतर आला आहे.त्यानिमित्त मंगळवारी दि.१२ रोजी खानापूर शहरातील भक्तानी गणेश मंदिरात पुजेसाठी गर्दी केली होती.तसेच शहरातील केंचापूर गल्लीतील गणेश मंदिरात ही भाविकांची गर्दी होती.
अंगारकी संकष्टीला चतुर्थीला हिंदु धर्मात फार महत्व मानले जाते. जास्त करून श्रावण महिण्यात हा योग येणे अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानले जाते.चतुर्थीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य मिळते .
या दिवशी गणेश भक्त दिवसभर उपवास करतात. आणि रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर गणपतीची पुजा करून उपवास सोडतात.
मंगळवारी अंगारकी संकष्टी निमित्त खानापूरातील गणेश मंंदिरात पहाटे पासुन अभिषेक ,पुजा व दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती.
अनेक भक्तानी अभिषेक करून आपली मनोकामना पूर्ण केली.