#खानापूर विठ्ठल मंदिरात पुजा आर्चा , भजनाचा कार्यक्रम साजरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्यातील गावोगावी आषाढी एकादशी रविवारी दि.६ रोजी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
खानापूर शहरातील विठ्ठोबा गल्लीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी विठ्ठल मंदिरात विठ्ठल रूक्मिणी मुर्तीला अभिषेक घालुन विधीवत पुजा करण्यात आली.विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात तुळशी हार व पुष्पहार घालुन दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी भक्ताना तिर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले . दिवसभर महिलानी भजन ,भारूड भक्ती भावाने गाऊन विठ्ठल मंदिर निनादुन सोडले.
दिवसभर खानापूर शहरातील विठ्ठल भक्तानी मनोभावे विठ्ठलरूक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यत विठ्ठल मंदिरात भजन टाळ मृदुंगाच्या नादात निनादत होते.