#प्रधान सचीव रश्मी महेश यांचा इशार्याला कचर्याची टोपली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शाळेतील मुख्याध्यापकाना व शिक्षकाना शाळेच्या वेळेत कोणतेही प्रशिक्षण ,कार्यशाळा इतर शाळाबाह्य कामासाठी नियुक्ती करू नये
अशा प्रकारे कोणालाही नियुक्ती केल्यास संबधित गटशिक्षिणाधिकारी ,जिल्हा शिक्षणाधिकारी , जिल्हाधिकारी व इतर अधिकार्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याच्या प्रधान सचिव रश्मी महेश यानी दिला आहे.
मात्र सोमवारी दि ७ रोजी खानापूर ता.प.सभागृहात खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या शेकडो बीएलओ शिक्षकाना बोलवुन शिबीराचे आयोजन करण्यात आले.
#शालेय शिक्षण आणि साक्षता खात्याच्या प्रधान सचिव रश्मी महेश याच्या आदेशाचे काय?
सरकारी शाळाचे निकाल सुधारण्यासाठी व चांगले अध्यापन देण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकानी वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. कारण शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकाना फक्त शिकविण्याची परवानगी आहे.
मुख्याध्यापकाना अथवा शिक्षकाना शाळेच्या वेळेत ओओडी अथवा लेखी आदेशाव्दारे कोणत्याही प्रशिक्षण ,कार्यशाळा,बैठकी अथवा इतर उपक्रमासाठी पाठवू नये.तसेच जिल्हाधिकारी ,जिल्हापंचायत कार्यनिर्वाहक
अधिकारी आदीनी कोणतेही निर्देश देऊ नयेत. शाळेच्या वेळेत कोणत्याही बैठका अथवा व्हिडीओ काॅन्फरन्सिंग करू नये.
याजबरोबर शाळाना भेटी देणार्या अधिकार्यानी वर्गात अडथळा आणु नये.
विद्यार्थ्याना शाळेबाहेरील कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी करू नये.
सार्वजनिक सुट्टी ,उन्हाळी सुट्टयामध्ये शाळाबाह्य कामाना परवानगी द्यावी.
या आदेशांचे उल्लंघन न करणारे जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी मुख्याध्यापकावर कारवाई केली जाईल.
यासाठी सरकारी शाळामध्ये दर्जेदार शिक्षण व निकाल लागण्यासाठी ५ कलमी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे.