#कुसमळी पुल अवजड वाहतुकीला बंदी!.
#अनमोड घाटात मार्गावर भेगा पडुन दरड कोसाळली !
#कारवार गोवा रस्ता ही आवजड वाहतुक वाढल्याने धोक्याचा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर हुन गोव्याला जाणारे तिन्ही मार्ग यंदाच्या पावसाळ्यात धोक्याची घंटा देत आहे.त्यामुळे खानापूर गोवा प्रवास तसेच वाहतुक सुखकर होणे येत्या पावसाळ्यात कठीण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कुसमळी वरील मलप्रभानदी पुलावर अवजड वाहनाना बंदी!
खानापूर तालुक्यातील कुसमळी जवळील मलप्रभा नदीवरील नव्या बांधण्यात आलेल्या फुलावरून अवजड वाहतुकीला निर्बध घातले आहेत. त्यामुळे बेळगाव खानापूर मार्गे गोव्याला जाणार्या अवजड वाहतुकीला बंदी घालण्या आली आहे.त्यामुळे चोर्ला मार्गे गोव्याला जाणारी अवजड वाहतुक ठप्प झाली आहे.
तर गोव्याला जाणार दुसरा मार्ग म्हणजे अनमोड मार्गे होय. परंतु अनमोड घाटात महामार्गावर भेगा पडल्या असुन सध्या दरड कोसळली आहे.त्यामुळे यामार्गावरून ही अवजड वाहने जाणे धोक्याचे झाले आहे.
दुसरा मार्ग रामनगर अनमोड रस्त्यावर दरड कोसळली!
रामनगर अनमोड महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने त्यातच प्रवाशाची वर्दळ असतानाच आता महामार्गावर चक्क Iron पडल्या आहेत. आता दरड कोसळली आहे. त्यामुळे वहातुक पूर्णपणे धोक्याची आहे दुधसागर वळणाच्या अलिकडे रस्त्यावर भेगा पडुन दरड कोसळत आहे .
तिसरा मार्ग कारवार गोवा!
खानापूर मार्गे कारवार मार्गे गोव्याला जाणारा महामार्ग असला तरी या मार्गे जाणार्या यल्लापूर मार्गे कारवाला जाणार्या रस्त्याची आवघड आवस्था झाली .यामार्गावर ही आवजड वाहतुक जोरदार सुरू आहे. या आवजड वाहतुकीमुळे हा रस्ता दिवसे दिवस खराब होत चालला आहे.ऐन पावसाळ्यात रस्त्याची दैयनिय आवस्था होणार आहे .
त्यामुळे खानापूर गोवा प्रवास आता वाहतुकीला ठप्प होणार आहे.