#शांतिनिकेतन पब्लिकस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता.खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन शनिवारी दि २१ जुन रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रूप एज्यूकेशन सोसायटीचे व आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते. तसेच पथंजली योग शिबीराचे अध्यक्ष वसंत देसाई ,दिपक मांजरेकर,,सुर्यकांत बाबसेट,कृष्णा वाघुर्डेकर,सौ.निर्मला देसाई,सौ.लक्ष्मी गुरव,मुख्याध्यापिका सौ स्वातीकमल वाळवेआदी उपस्थित होते.
यावेळी पथंजली योग समितीच्या सदस्यानी योगाचे महत्व व विविध योगासने करून प्रात्यक्षिके करून दाखविली.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले,की योगासाधनामुळे मुळे मनुष्याला अनेक फायदे आहेत.तेव्हा निरोगी शरीरासाठी व स्वास्थ मनासाठी योगा अतिशय आवश्यक आहे. म्हणून दररोज योगा केेल्याने शरीराला उर्जा मिळते. तसेच मनाला शांती मिळते.
यावेळी स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#