#खानापूरात पावसाची रिमझिम सुरूच, नदी नाल्याना पाणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या चार दिवसापासुन पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मलप्रभा नदीला पाण्याचा प्रवाह वाढला आहे.
तालुक्यातील कणकुंबी ,जांबोटी भागात मोठया प्रमाणात पाऊस पडतो.त्यामुळे मलप्रभा नदी प्रवाहित होऊन वाहते. या भागात पावसाचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाचे पाणी वाढल्याने मलप्रभा नदीला प्रवाह वाढतो.याचा परिणाम खानापूरातुन वाहणार्या मलप्रभा नदी दुथडी भरून वाहते.
खानापूरातील मलप्रभा नदीच्या घटावर पाण्याची पातळी वाढली!
खानापूरातुन वाहणार्या मलप्रभा नदीला जोरदार पावसामुळे नदी घाटावर पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदी घाटावरील पायर्या पाण्याखाली गेल्या आहेत. नदी घाटावर फिरताना नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे . पाण्याचा प्रवाह केव्हा ही वाढू शकतो.तेव्हा धोका टाळण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.
तालुक्यातील नाले ,तलावात पाण्याचा साठा!
खानापूर तालुक्यातील गावोगावी असलेल्या नाले, तलावात पाण्याच्या साठा दिवसेदिवस वाढत आहे. शिवारात पावसाच्या पाण्यामुळे पाणी झाले आहे. शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत.
सध्या तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. जर सतत पावसाचा जोर वाढला तर मलप्रभा नदीला पूर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.