#११ वर्षे विकसीत भारताचा अमृत कालसेवा, सुशासन,गरीबांचे कल्याणकारी !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
देशात भाजपच्या मोदी सरकारच्या ११ वर्षाचा विकसीत भारताचा अमृत काल सेवा पूर्ण झाला. सुशासन व गरीबांचे कल्याणकारी योजना यशस्वी झाल्या. निमित्त रविवारी दि २२ रोजी खानापूर शिवस्मारकात संकल्प सभा पार पडली.
यावेळी सभेला आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार संजय पाटील,भाजप जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील,उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल,प्रधान कार्यदशी सौ.धनश्री सरदेसाई संचालक महेश मोहिते ,सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात फोटो पुजनाने झाली.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की आज मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाले आहे. यानिमित्त विकसीत भारताचा अमृत काल सेवा ,सुशासन,व गरीबाचे कल्याणकारी यायोजना कशा यशस्वि झाल्या. हे प्रत्येकापर्यत पोहचने गरजे आहे .यासाठी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विरोधकाना गरीबांच्या कल्याणकारी योजना कशा यशस्वी झाल्या हे समजले पाहिजे.यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यापासुन नेत्यापर्यत प्रत्येकाने घरोघरी जाऊन मोदी सरकारची संकल्पना कशा यशस्वी झाल्या याची माहिती देणे गरजेचे आहे.
यासाठी येत्या १५ आँगष्ट पर्यत प्रत्येक बुथला जाऊन जागृती करावी.असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरानी मनोगत व्यक्त केले.