“इंदिरा कॅटीनचा लाभ सर्वानीच घ्यावा. एमएलसी हट्टीहोळी”
खानापूरात इंदिरा कॅन्टीनचा उदघाटन सोहळा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
काँग्रेस सरकारच्या सन २०१३ ते २०१८ सालात इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प सुरू केला. पुन्हा काॅग्रेस सरकार २०२३साली सत्तेवर आले.आणि पुन्हा इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प सुरू केला.त्यात खानापूर तालुक्यातुन खानापूर शहरात इंदिरा कॅन्टीनच्या प्रकल्पाला सुरूवात झाली. आज माझ्या हस्ते खानापूरच्या इंदिरा कॅन्टीनचा उदघाटन सोहळा पार पडला.याचा मला खूप आनंद होतोय.
तेव्हा खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीकांनी या इंदिरा कॅन्टीनचा लाभ घ्यावा.असे आवाहन एमएलसी चन्नराज हट्टीहोळी शनिवारी इंदिरा कॅन्टीनच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी खानापूर नगरपंचायतीचे चीफ आँफिसर यानी प्रास्ताविक केले.
यावेळी एमएलसी चन्नराज हट्टीहोळी व आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते दीपप्रज्वलन करून इंदिरा कॅन्टीनचे फित कापून उदघाटन केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की,खानापूर शहरात इंदिरा कॅन्टीन व्हावे ही गेल्या अनेक वर्षापासुनची मागणी होती. तो दिवस आज उगवला. इंदिरा कॅन्टीनमध्ये इतर हाॅटेल प्रमाणेच नाष्टा ,जेवन मिळणार आहे.सर्व सामान्य नागरीका़ना परवडेल अशा किमतीत व रूचकर आहार मिळणार आहे.तेव्हा सर्वानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
यावेळी नगरपंचायतीच्यावतीने एमएलसी चन्नराज हट्टीहोळी व आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच प्रोजेक्ट टायरेक्टर मल्लिकार्जून कलादगी यांचा शाल, हार व म्हैसुर फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ मिनाक्षी़ बैलूरक उपनगराध्यक्षा सौ जया भुतकी,स्थायी कमिटी चेअरमन आप्पया कोडोळी.
नगरसेवक प्रकाश बैलुरकर, लक्ष्मण मादार,,नारायण ओगले, हणमंत पुजारी,मझहर खानापूरी,महमदरफिक वारेमनी. तोहिद चांदखन्नावर , नगरसेविका सौ राजश्री तोपिनकट्टी,सौ.मेघा कुंदरगी,सौ लता पाटील,सौ.लक्ष्मी अंकलगी,फातीमा बेपारी ,साहेरा सनदी,
अभियंते तिरूपती राठोड,राजश्री वर्णेकर, राजू जांबोटी,,गंगाधर कांबळे, सुहास गुरव प्रेमानंद नाईक ,तसेच कॅाग्रेस तालुका अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, महांतेश राऊत,चंबान्ना होसमनी, सुर्यकांत कुलकर्णी,भाजपनेते राजेद्र रायका,सेक्रेटरी गुंडू तोपिनट्टी,प्रकाश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.