#जखमी युवक वरकड गावचा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रामनगर जोयडा महामार्गावर बसचा व दुचाकी( बुलेट) चा समोरासमोर जोराची धडक होऊन हरूरी (ता.खानापूर) येथील युवक अनिल संभाजी पाटील (वय.३४) हा मृत्यू पावला. तर दुसरा युवक जोतिबा गडकरी (वय.३३) वरकड (ता.खानापूर) हा जखमी झाला. हा आपघात शनिवारी दि.२१ रोजी सकाळी घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , अनिल पाटील व जोतिबा गडकरी हे बुलेट वरून खानापूरहुन जगलबेटकेड जात होते. यावेळी गोव्याहुन बेळगावकडे येणार्या बसला बुलेटची समोरा समोर जोराची धडक बसली. यात अनिल पाटील यांच्या डोकीला गंभीर मार बसला .तर मागे बसलेल्या जातिबा गडकरी याला किरकोळ दुखापत झाली.
लागलीच दोघानी ही रामनगर (ता.जोयडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आले. मात्र वाटेतच अनिलचा मृत्यू झाला. तर जोतिबावर उपचार करण्यात आले.
रामनगर पोलिसानी आपघाताची नोंद करून पुढील तपास करत आहेत.