ग्रामस्थांची मागणी
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी (ता. खानापूर ) ग्राम पंचायत हद्दीतील हत्तरगुंजी गावासाठी असलेल्या गायरान सर्वे नंबर २४ मधील १९ एकर ५ गुंठे जमिन गावासाठी कायमस्वरूपी गायरान म्हणून राखीव ठेवावी.अशी मागणी हत्तरगुंजी ग्रामस्थानी मंगळवारी दि.१४ रोजी सी ई ओ राहुल शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
कर्नाटक राज्य दलित संघटनेच्यावतीने हक्की पक्की व कातगार समाजाच्या समस्या निवारणा करण्यासंदर्भात हलकर्णी गायरान परिसरात मुक्कामास असलेल्या समाजाच्या समस्याची पाहणी सी ई ओ राहुल शिंदे यांनी केली.यावेळी हे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मैत्री,सहाय्यक निर्देशक विजय कोतीन व इतर अधिकारी उपस्थित होते.
हत्तरगुंजी ग्रामस्थानी गेल्या अनेक वर्षापासुन ही जमिन गावरान साठी राखुन ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान उर्वरीत जमिनीत कत्तलखान्यासाठी दोन एकर जमिनीची मागणी करण्यात आली होती मात्र आतापर्यत यापैकीसुमारे आठ एकर जमिन इतर समाजाची घरे व स्मशान भुमी उभारण्यासाठी जमिन मंजुर करण्यात आली .
उर्वरीत जमिनीत कत्तलखाण्यासाठी दोन एकर जागेची मागणी करण्यात आली होती.मात्र ती रद्द. करण्यात आली.
तसेच आयटीआय काॅलेजसाठी एकएकर जागा मंजुर करण्यात आली होती.मात्र ग्रामस्थानी विरोध दर्शविला नाही.
मात्र शिल्लक राहीलेली जमीन गावच्या गायरानासाठी राखीव ठेवावी आणि कोणत्याही परिस्थितीत तिचे हस्तांतरण करू नये.असे निर्देशन दिल्याची माहिती ग्रामस्थानी दिली.
यावेळी ग्रामस्थ गोपाळ आल्लोळकर,
बळीराम वांद्रे, पुंडलिक कोडचवाडकर,यल्लापा तिगडी, नागाप्पा अगनोजी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
