संदेश क्रांती न्यूज :
खानापूर, प्रतिनिधी :
खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशन व मॅनकाईंड फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूरातील हॉटेल वनमाला फंक्शन हॉल, येथे हृदयरोग व कुपोषण या महत्त्वपूर्ण विषयांवर वैद्यकीय चर्चासत्र उत्साहात पार पडले.
यावेळी चर्चासत्रामध्ये प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रभू हलकट्टी यांनी हृदयरोगाची कारणे, प्रतिबंध, आधुनिक उपचारपद्धती तसेच बदलती जीवनशैली आणि हृदयाचे आरोग्य याविषयी सखोल व मार्गदर्शक माहिती दिली. तसेच त्यांचे चिरंजीव डॉ. किशन हलकट्टी (एम.डी., क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट) यांनी मॉलन्युट्रिशन (कुपोषण) या विषयावर अतिशय सोप्या, शास्त्रीय व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन करून उपस्थित डॉक्टरांच्या विविध शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा परिचय खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई.नाडगौडा यांनी करून दिला.
चर्चा सत्रात डाॅ.सागर चिट्टी, डाॅ.राम पाटील,डाॅ.पी एन पाटील,डाॅ.चिट्टी,डाॅ कदम
डाॅ.वठारे,डाँ.किरण लाड,डाॅ.सागर नार्वेकर, डाॅ.मोटर,डाॅ.घाडी,डाँ.शंकर पाटील,
डाॅ.देवलतकर , डाँ.सौरभ,डाॅ.नंदगडी, डाॅ.फयाज,याच्यासह खानापूर तालुक्यातील सुमारे ३० डाॅक्टरानी सहभाग दर्शविला.
यावेळी उपस्थित डाॅक्टरानी चर्चा सत्रातील विषयाची मांडणी, तज्ञ्ज्ञाचे मार्गदर्शन व संवादात्मक पध्दतीचे विशेष कौतुक केले.अशा शैक्षणिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील डाॅक्टरांचे वैद्यकिय ज्ञान वृध्दिगंत होण्यासाठी मोठी मदत होत असल्याची भावना उपस्थित डाॅक्टरानी केली.
कार्यक्रमाचे आभार डॉ. वैभव पाटील यानी मानले.

