#विद्यार्थ्यासह अधिकार्यानी घेतली शपथ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नगर विकास विभाग, नगरपालिका प्रशासन यां च्या आदेशानुसार खानापूर नगर पंचायतीच्या वतीने खानापूर येथील सर्वोदय इंग्रजी माध्यम स्कूल मध्ये पावसाळ्यातील जलसंधारण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर नगर पंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट होते.
तर कार्यक्रमाला नगरपंचायतीचे अभियंते तिरूपती राठोड व इतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच स्कूलचे फादर व शिक्षकवर्ग उपस्थित होता.
यावेळी विद्यार्थ्याना शपथ देण्यात आली की, पाणी हे जीवन आहे.पाणी असेल तर सर्व काही होऊ शकते.त्यासाठी प्रत्येकाने घरात, समाजात, कामाच्या ठिकाणी पाणी वाचविण्याचा पर्ज्यन्यजल संचयन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून पाणी वाचू अशी शपथ घेतली.
यावेळी विद्यार्थ्यानी आपल्या घरा शेजारी, गल्लीत ,गावात पाणी वाचविण्यासाठी जागृती करण्याबाबत शपथ घेतली.
कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
अभियंते तिरूपती राठोड यानी आभार मानले.

