#सहायक संचालिका व पी डी ओ यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार!
संदे
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका पंचायतीच्या सहायक संचालिका रूपाली बडकुंद्री यांचा सेवानिवृत्ति निमित्त तसेच तालुक्यातील विविध पंचयातीचे पीडीओ यां च्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व नूतन सहायक संचालक शशीधर बेल्लारी याचे स्वागत असा दुहेरी सोहळा तालुका पंचायती च्या सभा गृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री होते.
यावेळी सेवानिवृत्त सहायक संचालित रूपाली बडकुंद्री,पीडीओ यशवंत घाडी ( हेब्बाळ),नारायण पाटील (जांबोटी),पुंडलिक हेब्बाळकर( बैलूर), विठ्ठल देवलट्टी( कक्केरी) यांचा सेवानिवृत्तनिमित्त शाल,पुष्पहार, भेटवस्तू देऊन पाहुण्याच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
तर नूतन सहायक संचालक शशीधर बेल्लारी याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री म्हणाले कि, सहायक संचालक रूपाली बडंकुद्री यानी खानापूर तालुक्यात एक जबाबदार अधिकारी म्हणून सेवा बजावली, त्यांच्या कामगारीबद्दल लेडी सिंग म्हणून त्याचा गौरव ही करण्यात आला.त्याच्या सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखासमाधानाचे जावो.तसेच तालुक्यातील विविध ग्राम पंचायतीच्या पीडीओ नी सुध्दा आपली सेवा प्रामाणिकपणे केली,त्याचे सेवानिवृतीनंतरचे आयुष्य सुखा समाधानाचे जावो अली सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी पी डी ओ अनंत भिंगे यानी सेवानिवृत्त सत्कार मुर्तीच्या कार्याबद्दल गौरवउदगार काढले , व उपस्थित मान्य वरांची भाषणे झाली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना रूपाली बडकुंद्री म्हणाल्या की गेल्या काही वर्षापासुन खानापूर तालु क्यात सेवा बजावताना बरे वाईट अनुभव आले आहेत.केवळ अधिकारी व कर्मचार्याच्या सहकार्यामुळे कर्तव्य बजावणे सोप झाले.येथील सेवेचा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहिल असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी ५१ ग्राम पंचायतीचे पी डी ओ,सचिव ,तसेच तालुका पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.