#तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किशोर हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली नविन पदाधिकारी जाहिर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजप युवा मोर्चाच्या नूतन कार्यकरनी पदाधिकारी खानापूर तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किशोर हेब्बाळकर यानी नुकताच अधिकृत यादी जाहिर केली.
या कार्यकरणीत तालुक्यातील विविध खेड्यातील युवकाना उपाध्यक्ष,सरचिटणीस सचिव,कोषाध्यक्ष,सदस्य त्याच बरोबर सोशल मिडीया प्रभारी,अशी विविध पदे देण्यात आली आहेत.
उपाध्यक्ष पदी गोपाळ भेकणे,अमित कुंडेकर,सुनिल गावडे,नागराज निंबोजी,अदृष्य तुरमुरी,संतोष पाटील ,सुरज पाटील आदीची निवड झाली आहे.तर कोषाध्यक्षपदी रोशन सुतार याची निवड करण्यात आली आहे.
सरचिटणीस पदी पवन गायकवाड,सुनील पेजोळी याची निवड झाली आहे.तर सचीव पदी गणेश पेडणेकर,सुमित कसर्लेकर,स्वप्निल मेलगे,गजानन झुंजवाडकर,विठ्ठल बाळप्पणावर,सागर देसाई,निलेश कुंभार याची निवड करण्यात आली आहे.
सदस्य. म्हणून जितेश पाटील,श्रीधर वांद्रे, विश्वनाथ हिरकन्नावर ,सचिन लाटगावकर, गिरीष लंगोटी, महादेव बरगावकर, रवी गावडे,गुंडूराव पाटील,राचया होन्नूर, दीपक गवाळकर, संदेश पाटील,रामदास भोसले,महादेव कुलम,यांची निवड करण्यात आली आहे.
सोशल मिडिया साठी गुरूप्रसाद पाटील यांची प्रभारी तर वेदांत कुलम ,गजानन हलगेकर, नागनाथ बुवाजी, यांची सहप्रभारी म्हणुन निवड करण्यात आली आहे.
यावेळी खानापूर तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किशोर हेब्बाळकर यांनी नवीन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. तसेच भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी व युवकानी पक्षाच्या वाचारधारेशी जोडण्यासाठी सर्वानी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.