#वाहनधारकाचा जीव धोक्यात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील बेळगाव पणजी महामार्गावरील माडीगुंजी गावाच्या बसस्थानका जवळील रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे.
जागोजागी पडलेल्या खड्यामुळे वाहनधारकाना तसेच दुचाकी स्वाराना या रस्त्यावरून ये जा करताना जीव मुठीत
घेऊन प्रवास करावा लागतो.
माडीगुंजी हे गाव उपतहसीलदार कार्यालय,रयत केंद्र ,कृषी केंद्र,सी आर सी सेंटर अशा विविध कार्यालयानी सजलेले या भागातील सर्वात जास्त लोक संख्या असलेले गाव असुन या गावाला वाहनाची तसेच प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते.
परंतु माडीगुंजी गावच्या स्मशानभुमी पासुन ते गावचे ग्रामदैवत माऊली मंदिर पर्यतच्या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
याखड्डयांकडे सबंधीत सार्वजनिक बांध काम खात्याचे तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचे यारस्त्याच्या खड्ड्यांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे माडीगुंजी ग्रामस्थानी न्याय कुणाकडे मागावा.असा प्रश्न गावकर्याना पडला आहे.
यारस्त्यातील खड्ड्यामुळे अनेक दुचाकी स्वारांचा आपघात होऊन गंभीर जखमी झाले आहेत.तर दररोज एक, दोन वाहनांचा आपघात होतच आहे.
तेव्हा संबधीत खात्याच्या अधिकार्यानी खड्ड्याची पाहणी करून त्वरित कच्चे बुजवावे, अन्यथा रस्त्यावर उतरूण रास्तारोको करण्याचा ईशारा माडीगुंजी गावचे सामाजिक कार्यकर्ता पंकज कुट्रे यानी दिला आहे .
.

