#खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार हणमंत गुरव व पदाधिकारी याच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने लैला शुगर कारखाण्याचे एम डी श्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा व शुभेच्छा खानापूर शहरातील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका कुस्तीगीर संघचनेचे अध्यक्ष निवृत्त सूभेदार हणमंत गुरव व पदाधिकारी यांच्या हस्ते एम डी श्री. पाटील यांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार हणमंत गुरव म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासुन लैला साखर कारखाण्याकडुन व श्रीमहालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी यांच्याकडुन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या कुस्त्या सुरळीत पार पाडव्यात या सा टी नेहमीच आर्थिक मदत मिळत असते.
एवढेच नव्हे तर खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदाराचे नेहमीच सहकार्य असते.
यापुढे याचे सहकार्य व आर्थिक मदत सतत राहुदे.असे विचार व्यक्त करून वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकार्यानी ही वाढदिवसाच्या शुभेच्छापर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार हणमंत गुरव, उपाध्यक्ष रूद्राप्पा बंकी, कार्याध्यक्ष राजाराम गुरव,खजिनदार लक्ष्मण झांजरे,सेक्रेटरी सदानंद होसुरकर, उप सेक्रेटरी प्रकाश मजगावी,सदस्य. यशवंत आलोळकर ,लक्ष्मण पाटील,शंकर पाटील,पांडुरंग पाटील,लक्ष्मण बामणे,जयवंत खानापूरकर,
भाऊराव पाटील,कल्लापा पाटील,मोहन निलजकर,नागाप्पा पाटील,लक्ष्मण चाळगुंडे,मोहन पाटील, अमोल बेळगावकर, मल्लापा मारीहाळ तसेच कुस्तीगीर संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

