खानापूर ( सुहास पाटील )
करंबळ ( ता.खानापूर ) येथील मराठा मंडळ संचलित करंबळ हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कदम तसेच शाळेचे सर्व सहशिक्षक उपस्थित होते.
यावेळी मनोज पाटील यांनी पर्यावरणाबद्दल अधिक माहिती सांगत आपण त्याचे संरक्षण कसे करू शकतो. याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगत भाषणे केली. पर्यावरण दिनानिमित्त वनरक्षक विभागाच्या वतीने शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी वनरक्षक विभाग खानापूर तालुका चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणाबद्दल जनजागृती !
तसेच पर्यावरणाबद्दल जनजागृती व प्लास्टिकचे दुरुपयोग त्याचबरोबर ई-वेस्ट संदर्भात समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी घोषणा देत गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शाळेचे सर्व सहशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.