#यात्रा मंगळवारी व बुधवारी दोन दिवस होणार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर शहराचे जागृत देवस्थान मर्याम्मा देवी मंदिर बेळगांव पणजी महामार्गावरील हलकर्णी फाट्यावर असुन सालाबाद प्रमाणे यंदाही मर्याम्मा देवीच्या यात्रा आज गळवारी दि. १० व उद्या बुधवारी ११ असे दोन दिवस होणार आहेत.
प्रथेप्रमाणे लक्ष्मीचे वार पाळण्यात आले असुन त्यानंतर मर्याम्मा देवीचे वार पाळुन शेवटच्या १२ व्या दिवशी देवीला नैवेद्य आणि ओटी आर्पण करण्यात आली.
आज मंगळवारी दि १० रोजी सकाळी मर्याम्मा देवीची विद्यावत पुजा, अर्चा होऊन यात्रेला सुरूवात होणार.
उद्या बुधवारी दि ११ रोजी सकाळ पासुन भाविकाकडुन देवीला नैवेद्य ,ओट्या भरण्यात येणार आहेत,नवस फडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
#वाहतुक ठप्प पोलिसांचे नियंत्रण राहणार!
दोन दिवस पणजी बेळगाव महामार्गावरील हलकर्णी फाट्यावरील मर्याम्मा मंदिराच्या आवारात भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे.
तेव्हा खानापूर पोलिसानी याची दखल घेऊन वाहतुक सुरळीत करवी.अशी मागणी खानापूर शहरातील नागरीकातुन होत आहे.
# यात्रेेनिमित्त खेळण्याची दुकाने !
मर्याम्मा देवीच्या यात्रनिमित्त खेळण्याची, पाळणे व विविध स्टाॅल लावण्यात आले आहेत. त्यामुळे यात्रेेला भाविकांची गर्दी वाढणार आहे.