#खाते एकाचे नाव दुसर्याचे !
#अर्ज देऊन वर्ष झाले तरी दुरूस्ती नाही.!
#तक्रार करून ही कर्मचार्यासह संचालकाचे ही दुर्लक्ष!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या ( खानापूर जांबोटी क्राॅस वरील ) खानापूर शाखेत कर्मचार्यानी गोंधळ माजला आहे.
गर्लगुंजी गावच्या शेतकर्याच्या खाते क्रमांकावर शेतकर्याच्या भावाचे नाव घालुन व्यवहार सुरू आहे. एका वर्षापूर्वी सबंधीत शेतकर्याने खात्यावरील चुकूची दुरूस्ती करावी.अशा मागणीचा अर्ज ही केला होता. त्या अर्जाला कचर्याची टोपी दाखवली होती . वर्षभर त्या अर्जाकडे संबधीत शाखेच्या कर्मचारानी दुर्लक्ष केले आहे.
यंदा ही जुन मध्ये ० टक्के कर्ज भरण्यासाठी गेले असता. त्या शेतकर्याच्या खात्यावर त्याच्या भावाचे नाव आज आहे.पुन्हा नाव बदलण्यासाठी अर्ज केला असता. १०० रूपयाचा बाॅड द्या.असा १०० रूपय भुर्दड खातेदारावर बसत आहे.
या संदर्भात संबधीत डी सी सी बॅकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील याना फोन व्दारे माहिती देऊन त्यानी ही याकडे लक्ष दिले नाही.
खानापूर तालुक्यातील डी सी सी बॅकेच्या खानापूर शाखेत अशा प्रकारचे अनेक सावळे गोंधळ होत आहेत.
याबाबत खानापूर तालुक्यातील शेतकर्यानी आवाज उठवुन खानापूर शाखेतील सावळा गोंधळ उजेडात आणावा. शाखेत सावळा गोंधळ थांबवावा.
खानापूर डी सी सी बॅकेचे निवडणूक जवळच!
येत्या काही महिण्यात डी सी सी बॅक खानापूर शाखेच्या संचालाकासाठी निवडणूक जाहिर होणार आहे. याकडे निवडणुकीकडे शेतकर्यानी जातीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा.व खानापूर डी सी सी बॅकेचा सावळा गोंधळ थाबविण्यासाठी विचार करावा. अशी मागणी खानापूर तालुक्यातील शेतकर्यातुन होत आहे.
खानापूरच्या डी सी सी बॅकेत स्थानिकाना रोजगार नाही.
एकीकडे खानापूर डी सी सी बॅकेच्या शाखेते तालुक्या बाहेरील कर्मचारी भरले आहेत.त्यातच त्यांचा सावळा गोंधळ करून शेतकर्याना मनस्थाप करून सोडले आहे.
तर दुसरी कडे खानापूर तालुक्यातील स्थानिक मराठी माणासाला रोजगार मिळत नाही.
यासाठी तालुक्यातील शेतकरी बंधुनी आवाज उठवुन स्थानिकाना रोजगार मिळावा.या साठी प्रयत्न करावा.