संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
देवलती ( ता.खानापूर ) येथील उच्च प्राथमिक कन्नड शाळाच्या खेळाडुनी नुकताच पार पडलेल्या क्लस्टर क्रिडा स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले.
मुलांच्या गटात वैयक्तीक स्पर्धेेत :साईस टक्केकर याने १०० मीटर धावणे तृतीय,४०० मीटर धावणे व्दितीय, गणेश सनदी याने २०० मीटर धावणे प्रथम ,४०० मीटर धावणे तृतीय,कृष्णा हुडेद ६०० मीटर धावणे तृतीय,श्रेयास टक्केकर ८० मीटर हडल्स प्रथम,प्रवीण कोळी लांब उडी प्रथम,गोळा फेक व्दितीय,प्रविण तलवार लांब उडी तृतीय क्रमांक पटकाविला.
सांघिक खेळात रिले ४×१०० प्रथम, कबड्डी प्रथम,व्हाॅली बाॅल प्रथम असे यश संपाद केले.
मुलींच्या गटात वैयक्तीक स्पर्धेत भूमीका इटगी १०० मीटर धावणे प्रथम, ६०० मीटर धावणे प्रथम,सविता जोगण्णावर २०० मीटर धावणे व्दितीय, ८० मीटर हडल्स तृतीय,लांब उडी तृतीय, साक्षी बडसाद २०० मीटर धावणे प्रथम ,पल्लवी मादार ८० मीटर हडल्स धावणे व्दितीय,उंच उडी तृतीय, साक्षी सिंगनगौडर उंच उडी प्रथम,गोळा फेक प्रथम क्रमांक पटकाविला.
सांघिक स्पर्धेत रिले प्रथम, खो खो व्दितीय,व्हाॅलीबाॅल प्रथम असे यश संपादन केले.
विजयी खेळांडुना क्रिडाशिक्षिका श्रीमती मीरा पाटील याचे मार्गदर्शन मिळाले असुन मुख्याध्यापक सी बी कोलकार व जयवंत निडगलकर ,सौ मंजुळा निडगलकर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
विजयी खेळांडुचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.