# श्रीकृष्ण मंदिर बाल विकास केंद्रात आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर ) येथील शिवाजी नगरातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सालाबाद प्रमाणे यंदाही शुक्रवारी दि.१५ रोजी गोकुळाष्टमी उत्सवाला मोठ्या भक्तीभावाने व श्रध्देने सुरूवात झाली.
प्रारंभी कलावती आईचे नामस्मरण आणि दुपारी श्रीकृष्णाला अभिषेक कार्यक्रम पार पडले.त्यानंतर दिपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
रात्री भजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री १२ वाजता श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी गर्लगुंजी परिसरातील बालगोपाळापासुन वृध्दा पर्यत महिलासह सर्वानी मोठ्या आनंदाने सहभाग दर्शविला होता.