संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता.खानापूर ) भागातील मलप्रभा नदीपरिसरात काही दिवसापासुन येथील हातखंडेश्वर देवस्थान जवळ अस्वलाचा वावर काही शेतकर्याना दिसुन आला.अस्वलासोबत एक पिल्लू असल्याने ते सरंक्षणासाठी ओरडत आहे. दिवसारात्री याभागातील शेतकरी शिवारात कामासाठी येजा करतात . तेव्हा अस्वलाने हल्ला करून कोणाच्या जीवाला धोका देण्या अगोदर वनखात्याने अस्वलाचा व त्याच्या पिल्लाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी नागरीकातुन होत आहे.
दरम्यान वनखात्याने याची दखल घेऊन अस्वलाला जंगलात हुसकाविण्यासाठी मोहिम राबविली आहे. यासाठी वनविभागाच्या उपवनअधिकारी माधुरी दळवाई यानी आपल्या सहकार्यासह चापगांव परिसरात पाहणी केली असता अस्वल आपल्या पिल्लाच्या संरक्षणासाठी ओरडल्याचा आवाज ऐकू येत असल्याचे त्यानी सांगातले.
कुणाचा जीव घेण्याआदी त्या अस्वलाला चापगांव परिसरातून जंगलात हुसकावुन लावण्यासाठी वनखात्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहेत.यासाठी वनखात्याने गस्त घालण्यासाठी सज्ज तयारी ठेवावी.
यावेळी वनखात्याच्या उपवन अधिकारी माधुरी दळवाई यानी शेतकर्यानी शिवारात जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे .