संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव खानापूर महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची महामार्गावरील दुभाजकाला जोराची धडक बसल्याने नंदगडचा एकजन ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दि.१४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. आपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव परशराम गोविंद बेळगावकर(वय.५१)
नंदगड असुन दुचाकीवरील मागे बसलेल्या युवकाचे नाव अमोल सिताराम अष्टेकर ( वय २१)नंदगड हा जखमी आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की.उद्यमबाग येथे परशराम बेळगावकर हा नियमित कामाला जातो. शनिवारी दुपारी काम संपवुन दुचाकीवरून नंदगड येथ असताना सायंकाळी बेळगाव खानापूर महामार्गावरील मलप्रभा नदीवरील पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला जोराची धडक बसल्याने परशराम बेळगावकर यांचा जागी मृत्यू झाला. मागे बसलेला अमोल अष्टेकर हा गंभीर जखमी झाला.त्याला लागलीच उपचारासाठी बेळगांव येथे पाठविण्यात आले आहे.
परशराम बेळगांवकर याच्या पश्चात पत्नी ,आई वडील असा परिवार आहे.