#तहसीलदार दुंडाप्पा कोमार विरोध्दात डी सीच्या कडे तक्रार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे दंडाधिकारी म्हणून ओळखणार्या तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी गुरूवारी दि. ९ रोजी एस आय आर संदर्भात तालुका पंचायतीच्या सभागृहात बोलविलेल्या पीडीओ च्या बैठकीत पीडीओना आपमानास्पद वागणुक देऊन त्याच्यावर आरेरावीची भाषा वापरत अंगावर धावून जाण्यापर्यत मजल मारली.
त्यामुळे वैतागलेल्या पी डी ओ नी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांच्याबाबत जिल्हा अधिकारी महम्मद रोशन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगीतले.
तालुका पंचायती च्या सभागृहात एस आय आर संदर्भात बोलविलेल्या बैठकीत पीडीओ, ग्राम पंचायत डेटा एन्ट्री आँपरेटर व इतर अधिकारी वर्गाला एसआय़आर मधील आडचणी, शंका विचारण्याची संधी देण्यात आली.यावेळी यासंदर्भात मतदार यादीसंदर्भात प्रश्न विचारताच तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी म्हणने एकूण न घेताच गप्प बसण्याचे सांगताच सर्वानीच नाराजी दाखवत तणाव निर्माण झाला.पीडीओनी आमच्या शंका शांतपणे एकून घ्या.अशी विनंतीही केली.मात्र तहसीलदारानी सर्वाशी आरेरावाची भाषा वापरत बैठकीतुन बाहेर जाण्यास धमकावले.
एवढेच नव्हे तर यापूर्वीही तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी अधिकारी व कर्मचार्याशी तसेच महिला कर्मचार्याशी असभ्य भाषेत बोलणे,सर्वासमोर अवमान करणे, ग्राम पंचायत कर्मचार्याना मानसीक त्रास देने असे आरोप असल्याचे या वे ली सांगण्यात आले.
याजबरोबरोबर जात गणना कामाच्यावेळी पीडीओना अवमानकारक भाषेत वर्तणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.पहिल्यांदा झालेल्या एसआयएरच्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या डेटा एन्ट्री आँपरेटना लाॅपटाॅप ,प्रोजेक्टर व इतर साहित्याच्या कारणावरून तहसीलदारा कडुन शिवागाळ झाली असल्याचा ही आरोप झाला आहे.अशा अनेक घटना खानापूर तालुक्यातील घडल्या आहेत.
तेव्हा अशा संदर्भात घटनाची चौकशी करून तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर पीडीओ अनंत भिंगे,बलराज बजंत्री,व्ही बी सज्जन,पी पी सायनाक, एम एम मो काशी,आर टी रोडार,एस ए आंबरे,रेश्मा एम पी,दीपा एम, आरती एस,विजयालक्ष्मी एस, तसेच ग्राम पंचायत डेटा एन्ट्री आँपरेटर,व कर्मचारी आदीच्या सेवाक्षर्या आहेत.
तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची प्रतिक्रिया!
ता प सभागृहातील एस आय आर बैठकीत महत्वाचे विषय असल्याने बैठकीत आवश्यकत्या सुचना देण्यात आल्या. को क्या अधिकारी व कर्मचार्याचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता.
या बैठ कीत काही संवादाचा गैरसमज झाला असावा, सरकारच्या कामकाजात शिस्त तसेच वेळेचे पालन करने आवश्यक असल्याने त्यानुसार मार्गदर्शन करण्यात आले आहे.
माझ्या विरोध्दात करण्यात आ ले ले आरोप निराधार व वस्तुस्थिला धरून नाहीत.
या प्रकरणाची चौकशी झाल्यास सत्य समोर येईल.
