संदेश क्रांती न्यूज:
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावच्या सुनबाई व मच्छे( ता. बेळगाव) लक्ष्मीनगर येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सहशिक्षिका सौ.निला बी.बाळेकुंद्री ( पाटील)या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतुन शुक्रवारी दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
त्यानिमित्त त्यांचा परिचय !
सौ. निला बी.बाळेकुंद्री( पाटील) यांचा जन्म दि.१० जूलै १९६६ रोजी कंग्राळी (खुर्द) येथे झाला.त्यांनी टी सी एच ,बी ए पदवी घेऊन सन १९९५ साली इदलहोंड ( ता.खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत शिक्षकी सेवेला प्रारंभ केला.
इदलहोंड येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत तब्बल १५ वर्षे सेवा बजावली.त्यानंतर त्याची बदली निट्टूर (ता.खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत सन २०१५ साली झाली.याशाळेत ५ वर्षे सेवा बजावत खानापूर तालुक्यात २० वर्षो सेवाबजावुन त्याची बदली बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत सन २०१५ साली झाली.या शाळेत ४ वर्षे सेवा करून तेथून त्याची बदली मच्छे,(ता. बेळगाव) लक्ष्मीनगर येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत सन २०१८ साली झाली.याशाळेत शिक्षकी सेवाबजावत असताना मार्च २०२५ साली पालक मंत्री सतीश जारकिहोळी यांच्याहस्ते जिल्हा स्तरीय गुरू स्पंदन आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच नोव्हेंबर २०२५ साली सरकारी मराठी शिक्षक कल्याण संघ यांच्याकडुन तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार आमदार राजू सेठ यांच्याहस्ते कुमार गंधर्व कलामंदिरात सत्काराने गौरविण्यात आले.
त्याच्या एकूण ३१ वर्षाच्या शिक्षकी सेवेच्या काळात त्याचे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन अधिकारी पदावर कार्यरत आहेत.विद्यार्थी चांगले घडले. उच्च पदावर गेले हीच माझी गुरूदक्षिणा असा आनंद त्याना आहे.
श्री पिसेदेव को आँप, सोसाटीचे निवृत्त मॅनेजर सुरेश पाटील यांच्या त्या पत्नी होत.
त्यांचा चिरंजीव स्वप्नील हा बी ई होऊन पुणा येथे सेवा बजावतो.तर कन्या सुमेधा ही पुण्यामध्ये एम बी ए चे शिक्षण घेत आहे.
त्याचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखा समाधानाचे जावो.त्याना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
