संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातीलमराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूल येथे शिक्षण खात्याच्या वतीने व पोलीस खात्याच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी होते.तर प्रमुख अतिथी म्हणून खानापूर पोलीस ठाण्याचे सब इन्स्पेक्टर श्रीमती आर एस सपाटे होते व शिक्षण खात्याच्या वतीने सीआरपी बसवराज जनकट्टी उपस्थित होते.
प्रारंभ पीएसआय श्रीमती सपाटे व श्री जनकटी यांच्या हस्ते रोपटाला पाणी घालुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या श्रीमती सपाटे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहून आपले आरोग्य व शैक्षणिक क्षमता सुधारून घेण्याचे आव्हान केले.
तर श्री.जनकटे यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण लक्ष शिक्षणाकडे देण्याचे आवाहन केले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, विद्यार्थ्यानी कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता आपले संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे.व आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आरोग्य चांगले असेल तर विद्यार्थी जे काही वाचतात ते लक्षात राहतं असं सांगत चांगला समाज निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग द्यावा. असे विद्यार्थ्यांना आवाहन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक टी आर पत्री यांनी केले. व आभार प्रदर्शन पीपी काशीद यांनी मानले.

