संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पणजी बेळगाव महामार्गावरील लोढा ते संगरगाळी पर्यतच्या सर्व्हिस रोड वर नुकताच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्याचे साम्राज्य पसरले होते. नुकताच त्या खड्डयात माती टाकून दिल्यामुळे चिखल झाला आहे.
त्यामुळे चिखलातुन बस ,आवजड वाहने ये जा करताना तारेवरची कसरत होत आहे.त्यामुळे अनेक आवजड वाहने रस्त्यात अडकण्याची शक्यता आहे.
पणजी बेळगाव महामार्गावरील गुंजी ते संगरगाळी पर्यतच्या सर्व्हीस रोडची दुरावस्था झाली आहे. यारोडवर इतके खड्डे पडले आहेत.की, लोंढा खानापूर बस वाहतुक बंद होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबधीत खात्याच्या कंत्राटदाराने रस्त्यावरील खड्ड्यात माती टाकून हात झटकला.
मात्र आवजड वाहने खड्डयात टाकलेल्या मातीमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातुन वाहने अडकून पडण्याची शक्यता आहे.
आजुन मोठे पाऊस होणार आहेत, त्यामुळे रस्त्यावरील टाकलेल्या खड्ड्यात चिखल होऊन वाहन धारकाना याचा त्रास होणार आहे.
तेव्हा संबधीत कंत्राटदाराने गुंजी ते संगरगाळी पर्यतच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यामध्ये केवळ माती न टाकता दगड खडी टाकुन खड्डे बजवुन या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत करणे गरजेचे आहे.परंतु केवळ माती टाकुन खड्डे बुजविल्याना वाहन धारकाना याचा पावसात त्रास सहन करावा लागणार आहे.
प्रतिक्रिया:
गुंजी गावापासुन संगरगाळी गावापर्यतच्या सर्व्हिस रोड वर पडलेले खड्डे बुजवून त्यात केवळ माती टाकल्याने रस्ता वाहतुकीला
चिखलमय झाला आहे.
त्यामुळे यारस्त्यावरून येजा करणार्या वाहन धारकाना तसेच लोंढा खानापूर बससेवेला येजा करताना चिखलाशी सामना करावा लागणार आहे.
तेव्हा चिखला पेक्षा खड्डे बरे म्हण्याची वेळ वाहन धारकाना आली आहे.
पंकज कुट्रे सामाजिक कार्यकर्ते गुंजी
