संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता.खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या खेळाडूनी नुकताच बेळगाव येथील संतमीरा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पटांगणावर विद्याभारती जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत पार पडल्या.
या क्रिडास्पर्धेत जिल्हातील ८ स्कूलनी भाग घेतला होता. यामध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या खेळांडुनी २३ सुवर्णपदके तसेच २१ रौप्यपदके ,आणि १९ कास्य पदके पटकावून भरघोस यश संपादन केले आहे.
यामधील ३० खेळांडुची पुढील महिण्यात बेंगळुर येथे होणार्या राज्यस्तरीय क्रिडा निवड झाली आहेे. तसेच १४ वर्षा खालील मुलांचा गट,व १७ वर्षाखालील मुलींचा गट तसेच व्हाॅलीबाॅल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.तर तन्वी जाधव हिने १४ वर्षाखालील वैयक्तीक चॅम्पियनशिप तसेच १७ वर्षाखालील वैयक्तीक चॅम्पियनशिप अमिकेत कुंभार याने पटकाविला. तसेच योगा, कराटे व चेससाठी खेळांडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वि खेळांडुचे आमदार व श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक , चेअरमन विठ्ठलराव हलगेकर,संचालक व सदस्यानी अभिनंदन केले.
या विजयी खेळांडुना स्कूलच्या प्राचार्या सौ.स्वातीकमल वाळवे,क्रिडाशिक्षक व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.