#मुर्तीना रंग देण्यात मुर्तीकार मग्न !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका गणशे मुर्ती तयार करण्यासाठी प्रसिध्द आहे. तालुक्यातील अनेक खेडेगावात गणेश मुर्त्या तयार केल्या जातात.
खानापूर तालुक्यातील सिंगीनकोप,गर्लगुजी़,तोपिनकट्टी, खानापूर, गणेबैल,डुक्करवाडी, नंदगडसह अनेक खेडेगावातील कुंभार गणेशमुर्तीकार मुर्ती तयार करण्याचे काम करतात.
आजतागायत शेडूमिश्रीत मातीपासून गणेश मुर्ती तयार करण्यात सर्वाचा पुढाकार होता. परंतु पीओपी गणेशमुर्त्याचे आगमन झाले .त्यामुळे शहरापासुन गावोगावी पीओपी गणेशमुर्त्यानी आपले स्थान मांडले आहे.
पीओपी मुर्तीवर बंदी मुर्तीकारात नाराजी!
गणेशोत्सव महिण्यावर येऊन थांबला आहे. सरास पीओपी गणेश मुर्त्या तयार करताना गणेश मुर्तीकार दिसत आहे. अशावेळी पीओपी मुर्त्यावर बंदी घालणे सरकारचा मुर्खपणा आहे. सर्वच ठिकाणी पीओपी गणेश मुर्तीना जोरात मागणी आहे. तेव्हा पीओपी गणेश मुर्त्या करणे थांबणार नाही. असे मत गणेश मुर्तीकार जातिबा कुंभार यानी नगरपंचायतीच्या बैठकीत बोलताना सांगीतले .
सध्या तालुक्याच्या सर्वच ठिकाणी पी ओपीच गणेश मुर्त्या करताना दिसत आहेत.