,इंडियन कराटे क्लब बेळगावला पहिली जनरल चॅम्पियनशिप मिळवुन देणारी एकमेव कराटेपटू अदिती नाडगौडा हिचे अभिनंदन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरातील नावाजलेल्या समर्थ इंग्रजी माध्यम स्कूलची कराटे पटू कुमारी आदिती डी नाडगौडा हिने सन २०२५ सालातील गदग (कर्नाटक) येथे ९ व्या अखिल भारतीय निमंत्रित कराटे स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळून यश संपादन केले.
तिने कुमितेत प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. तसेच काटाप्रकारात कांस्यपदक पटकावुन उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्दल बेळगाव जिल्ह्यासह खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
तिला मास्टर गजेंद्र बी काकतीकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
कराटे पट्टू अदिती डी नाडगौडा हिने इंडियन कराटे क्लब बेळगावला प्रथम जनरल चॅम्पियनशिप मिळवुन देत आहे.
तिला खानापूर समर्थ इंग्रजी स्कूलच्या प्राचार्या सौ दिव्या डी नाडगौडा व इतर शिक्षकाचे सहकार्य मिळत आहे.
समर्थ इंग्रजी स्कूलचे सचीव व खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ .डी ई नाडगौडा याची ती कन्या होय.