#पहिली ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्याना वितरण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप ( ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यतच्या जवळ पास ४२ विद्यार्थ्याना गर्लगुंजी गावचे तलाठी श्री सायबनावर यानी विद्यार्थ्यासाठी अँडेटी कार्ड ( ओळख पत्रक) भेटी दाखल देऊ केले.
सन २०२५ -२६ सालच्या शैक्षणीक सत्राला जुन पासुन सुरूवात झाली. विद्यार्थ्याच्या गळ्यात अँडेटी ( ओळख पत्रक) असावे. त्यामुळे विद्यार्थ्याचा त्याचा फायदा होता. यासाठी श्री सायबन्नावर ही मदत देऊ केली.
नुकताच शाळेमध्ये या अँडेटी कार्डचे शिक्षकानी विद्यार्थ्याना वितरण केले.
यावेळी मुख्याध्यापक पी.के.सुतार,पी एम कुंभार शिक्षिका सौ.एल.डी.नलवडी, नामदेव कुंभार व विद्यार्थी उपस्थित होते.