#वनखात्याचे शेतकर्याना आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता.खानापूर ) शिवारात गेल्या काही दिवसापासुन अस्वलासह त्याच्या पिलाचा वावर सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी भितीच्या छायेत वावरत आहेत.
यासंदर्भात माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वा खाली जिल्हा मुख्य वनसंरक्षण अधिकार्याना निवेदनव्दारे अस्वलाचा बंदोबस्त करावा.असे निवेदन देऊन मागणी केली.
याची दखल घेऊन बुधवारी दि १८ रोजी खानापूरचे आर.एफ.ओ.श्रीकांत पाटील,नंदगड उपवलय अधिकारी माधुरी दळवाई ,वनरक्षक शंकर तारीहाळ ,प्रशांत व गुरू कुंभार आदी कर्मचार्यानी चापगांव ग्राम पंचायत सदस्यासह शेतकर्याना घेऊन ज्या परिसरात अस्वलाचा वावर आहे. त्या परिसरात अस्वलाचा शोध मोहिम जारी केला .
यावेळी वनखात्याच्या अधिकार्यानी अस्वलाच्या बंदोबस्तासाठी मोहिम राबविली असुन शेतकर्यानी वनखात्याला सहकार्य करावे.
तेव्हा अस्वलाचा बंदोबस्त करीतो पर्यत रोज सायंकाळी सहानंतर ते पहाटे पर्यत शिवारात जाण्यास धाडस करू नये.
त्याचबरोबर अस्वलाचे दर्शन घडताच मोबाईल नंबर ८६३८२६१९२३ अथवा ग्राम पंचायत अध्यक्ष ,सदस्यांशी संपर्क साधावा .असे आवाहन वनखात्याने केले आहे.