संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्यापासुन पाऊसाचा जोर सुरूच आहे. त्यामुळे दोन दिवस शाळाना सुट्टी देण्यात आली. नदीनाल्याच्या पाण्याच्या पात्रात वाढ झाली असुन अनेक ठिकाणी झाडे कोसळुन नुसकसान होत असताना मंगळवारी दि.१९ रोजी दुपारी तीन वाजता खानापूर शहराजवळील पणजी बेळगाव महामार्गावरील रूमेवाडी क्राॅसजवळ भले मोठे आंब्याचे झाड कोसळले . त्यातुन चारचाकी वाहनधारक वेळ चांगली म्हणून बचावला. त्यामुळे जीवीत हानी झाली नाही. तर वाहतुक बर्याच वेळ ठप्प झाली.
खानापूर शहरापासुन ते रूमेवाडी क्राॅस पर्यत अनेक जुनाट झाडे उभी आहेत.
अशाच प्रकारचे जुनाट आंब्याचे झाड रूमेवाडी क्राॅसजवळ उन्मळुन भर रस्त्यात पडल्याची माहिती खानापूर लायन्स क्लबचे सदस्य अजित पाटील यानी दिली.
याचवेळी चार चाकी वाहनधारकाला झाड उन्मळुन पडण्याचे कळताच चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला घेतले.अन्यथा तेच झाड चारचाकी वाहनावर पडले असेत. व मोठे नुकसान झाले असते.मात्र वाहतुक ठप्प झाली.
लागलीच वनखात्याला झाड पडल्याची माहिती देण्यात आली वनखात्याच्या कर्मचार्यानी झाड बाजुला हटवून रस्ता वाहतुकीला सुरळीत केला.