“निडगलचे कै. गुरूवर्य व्ही.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ हरिपाठ पुस्तकाचे विद्यार्थ्याना वितरण”
#गर्लगुंजी,निडगल,सन्नहोसुर,बरगाव,भंडरगाळी शाळेच्या विद्यार्थ्याना वाटप!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लहान वयातच मुलाना भक्तीमार्गाचे बाळकडू मिळावे.त्याना भागवत धर्माचे ज्ञान व्हावे. आणि मोबाईल सारख्या व्यसनापासुन दुर राहुन भजनाची गोडी निर्माण व्हावी. या उद्दोशाने हरिपाठाचे वितरण निडगल ( ता.खानापूर ) येथील श्री सिध्देश्वर संगीत भजनी मंडळ यांच्यावतीने कै.गुरूवर्य विष्णूपंत दत्तात्रय पाटील ( व्ही.डी.पाटील ) यांच्या स्मरणार्थ प्रकाशित केेलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज लिखित हरिपाठ पुस्तकाचे वितरण गर्लगुंजी,निडगल,सन्नहोसुर,बरगाव,भंडरगाळी मराठी शाळेच्या विद्यार्थ्याना वाटप करण्यात आले.
यावेळी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षकवर्ग,पालकवर्ग ,विद्यार्थी व निडगल येथील श्री सिध्देश्वर संगीत भजनी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.