{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#लाखो रूपयाचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या खानापूर तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्याच्या खेडोपाडी जुनी घरे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
मेरडा (ता.खानापूर ) येथील गणेश मुर्तीकार तुकाराम परशराम सुतार यांचे राहते घर कोसळुन लाखो रूपयाचे नुकसान झाले
आहे.
गणेश मुर्तीकार तुकाराम परशराम सुतार शाडूच्या गणेश मुर्त्या करतात. त्याच्या शंभर हुन अधिक गणेश मुर्त्या घर कोसळल्याने मातीच्या ढिगार्याखाली सापडल्या.त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घर कोसळल्याची घटना समजताच ग्राम पंचायतीचे चेअरमन ,सदस्य व गावकर्यानी घटनास्थळी जाऊण पाहणी केली .व संबधीत खात्याच्या अधिकार्याकडुन अर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
काही दानशुर व्यक्तीनी अर्थिक मदत करण्यासाठी हात पुढे केले आहेत.