#दोन दिवस चालणार सोहऴा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगाव ( ता.खानापूर ) येथील ग्राम दैवत दक्षिणमुख श्रीमारूती मंदिराचा लोकार्पण सोहळा गुरूवारी दि. २ एप्रिल रोजी होत आहे.
या निमित्त बुधवारी दि.१ एप्रिल रोजी बिळकी अवरोळी मठाचे प.पूज्य श्री चन्नबसव देवरू यांच्या सान्निध्यात सकाळी ९ वाजता दक्षिणमुखी श्री मारूती मंदिरात कुंभोत्सव नूतन कळस ,श्री मारूतीच्या ताम्रमुर्ती व शनिदेव मुर्तीची गावातुन मिरवणुक व दैवतांचा ओटी भरने कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता गोपूजा, गंगा पुजा,गणपती आराधना, रक्षौज्ञ हवण, रात्री ८ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम ,गावातील जेष्ठाचा सत्कार,साक्षी पाटील वड्डेबैल हिचा रात्री हरी जागर,
गुरूवारी दि.२ रोजी पहाटे ब्राम्ही शुभमुहर्तावर गणपती पूजा,वास्तूशांती,मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा,रूद्राभिषेक,कळसारोहण, महा आरती,सकाळी ११ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव दुपारी १२ वाजता श्री रेणुका देवीच्या नावे परडी भरणीचा कार्यक्रम,दुपारी महाप्रसादाचे आयोजन,सायंकाळी सहा वाजता दक्षिणमुख श्री मारूती मंदीराचा लोकार्पण सोहळा व हिंदू धर्म जागृती सभा होणार आहे.
तर मंदिर उभारणीत योगदानाबद्दल मारूती पुन्नाप्पा चोपडे व परिवारांचा जाहिर सत्कार ,सायंकाळी ७ वाजता प्रबोधनकार हभप अनिल महाराज देवळेकर, बत्तीस शिराळा, यांचे हिंदुत्व वादी प्रबोधन होणार आहे.तसेच शोध चंपावती नगरीचा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे.
तरी सर्वानी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थानी केले आहे.

