वाढदिवसानिमित्त डाँ.बाबासाहेब
आंबेडकर दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्याना कपड्यांचे वितरण, जेवणाची सोय!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील विनय वैजनाथमठ व विजय वैजनाथमठ या जुळ्याबंधुच्या वाढदिवसानिमित्त खानापूर विद्यानगरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग कल्याण संस्थेच्या २० अपंग विद्यार्थ्याना कपड्यांचे वितरण व दुपारी जेवऩ देऊन आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी खानापूर लायन्स क्लबचे माजी चेअरमन सागर उप्पीन यानी विनय, विजय या जुळ्याबंधुच्या वाढदिवसाचा उद्देश स्पष्ट केला.व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते २० दिव्यांग विद्यार्थ्याना कपड्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर लायन्स क्लब चे माजी चेअरमन सागर उप्पीन, विशाल उप्पीन, मनोज नाईक, सौरभ माने ,संदेश धबाले, संदीप अंगडी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग कल्याण संस्थेचे सदस्य पुंडलिक कुंभार ,अनिल सावंत,कार्तिक मादार तसेच शिक्षक व दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार अनिल सावंत यानी मानले.
