शुक्रवारी खासदार खानापूर दौर्यावर,हलशी लक्ष्मी यात्रा,चिकदिन्नकोप हायस्कूल कार्यक्रम,बिडी येथे कार्यक्रमाना उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे तब्बल तीन महिण्यानंतर खानापूर तालु क्या च्या दौर्यावर उद्यान शुक्रवारी दि १० रोजी येत आहेत.
शुक्रवारी दि १० रोजी सकाळी ९. ३० वाजता हलशी व हलशीवाडी गावची ग्राम देवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला भेट देऊन देवीचे दर्शन घेणार आहेत.
तर सकाळी ११.३० वाजता चिकदिन्नकोप ( ता. खानापूर ) येथील हायस्कूलच्या स्मार्ट बोर्डच्या उदघाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दुपारी १ वाजता बिडी येथील कार्यक्रमात भाग उपस्थिती दर्शविणार आहेत.
अशी माहिती खानापूर तालुका भाजप पक्षाच्या पदाधिकार्यानी दिली आहे.
