#ग्रामस्थाना प्रिती भोजनाचा कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी (ता. खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटीच्या प्रगतीशील शेतकरी पॅनलच्या विजयी पाच संचालकांचा सत्कार नुकताच पार पडला.
यावेळी जांबोटी येथील ‘राजवाडा’ मध्ये श्रीमंत सरकार कर्णसिंह सरदेसाई यांच्या उपस्थितीत ‘प्रगतीशील शेतकरी पॅनेल’ च्या विजयी पाच संचालकांचा सत्कार करण्यात आला. सत्कार निमित्त विजयी पाच संचालकाचा शाल व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
या सत्कारनिमित्त सर्व गावातील समर्थकांना प्रितीभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी पी.के.पी.एस. सोसाय़टीच्या मा जी चेअरमन सौ.धनश्री सरदेसाई तसेच विजयी
संचालक सुधाकर गावडे, चंद्रकांत देसाई, भाऊ कुर्लेकर, शांता गावडे, दुर्गाप्पा तळवार.
माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, महेश सडेकर, विठ्ठल देसाई, रमेश देसाई, कृष्णा राणे व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विजयी संचालकाचा सत्कार सोहळा पार पडला.
