#महाप्रसादाचेआयोजन!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
हत्तरगुंजी ( ता.खानापूर ) येथे उद्यान गुरूवारी दि.२ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त पहाटे ६ वाजता पुरोहितीकडुन श्रीच्या मुर्तीवर अभिषेक , पुष्पवृष्टी होऊन श्री ला पाळण्यात घालुन महिलाच्यावतीने पाळणा गीत गाऊन श्रीचा जन्मोत्सव व पुष्पवृटी होणार आहे.
तर दुपारी तीन वाजता गाथा भजन होऊन सायंकाळी ६ ते ७ वाजता हभप शशिकांत गावडे याचे प्रवचन रात्री किर्तन हभप कृष्णमुर्ती बोगाळे यांचे सांप्रदायिक किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकानी यांचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
