#रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत वीजपुरवठा खंडीत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
उद्या रविवारी दि. २९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत खानापूर शहरासह तालुक्यातील लैला साखर कारखाना,
देवलती,गर्लगुंजी, करंबळ ,लोकोळी मोदेकोप,काटगाळी,गणेबैल, खानापूर इंडस्ट्रियल परिसर,कोर्ट परिसर,हेब्बाळ,लोंढा,तसेच एस डब्ल्यू आर टी सी खानापूर भागात वीज पुरवठा खंडीत होणार आहे.
कर्नाटक पाॅवर ट्रान्स मिशन काॅपोरेशन लिमिटेड ( केपीटीसीएल) यांच्यावतीने खानापूर येथील ११० के व्ही उपकेंद्रात देखभाल व तांत्रिक कामा सा टी रविवारी वीजपुरवठा खंडीत होणार आहे.
तेव्हा सदर काम नियोजित देखभालीचा भाग असुन नागरीकानी सहकार्य करण्याचे आवाहन खानापूर हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगले यानी केले आहे.
