#सोमवारी महाप्रसादाचे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कबनाळी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही ब्रम्हचैतन गुरू वीर्य नामदेव वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशिर्वादाने व हभप शिवाजी देसाई यांच्या कृपाशिर्वादाने श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताह सोहळा रविवारी दि २९ व सोमवारी दि.३० रोजी असे दोन दिवस चालणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीताराम राणे उपस्थित राहणार आहेत.
तर दिप प्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील,भाजप राज्य महिल्या कार्यकारणी सदस्या सौ धनश्री सरदेसाई,हभप विठोबा सावंत, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अरूण गावडे,ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर, नेते यशवंत बिर्जे, आदीच्याहस्ते होणार आहे.
तर विविध मान्यवराच्याहस्ते देवदेवतांच्या प्रतिमेचे पुजन होणार आहे.तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार आहेत.
प्रारंभी रविवारी सकाळी पोतीस्थापना होऊन सायंकाळी किरहलशी येथील हभप सदानंद पाटील यांच किर्तन, तर हभप विनोबा सावंत यांचे किर्तन ,,पकवज साथ शंकर पाटील, जगन्नाथ चिखलकर यांची आहे.
तर रात्री १२ वाजता मुघवडे, निलावडे,
आंबोळी,कोकणवाडा,बांदेकरवाडा यांचे हरिभजन आदी कार्यक्रम होणार आहेत..
सोमवारी दि.३० रोजी पहाटे काकड आरती
, सकाळी १० ते ११ श्री सत्यनारायण महापुजा,त्यानंतर गावातुन दिंडी सोहळा होऊन दुपारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.रात्री ९ वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
