#कर्नाटक राज्य नेटबाॅल संघाचे करणार प्रतिनिधित्व!
#खानापूर रेल्वेस्टेशन स्थानकावर दिल्या शुभेच्छा!
#तिच्या यशामुळे सर्वत्र अभिनंदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची नेटबाॅल खेळांडु अदिती डी.नाडगौडा हिची कर्नाटक राज्य ज्युनिअर १९ वर्षाखालील नेटबाॅल संघात निवड झाली आहे.
कर्नाटकाच्या अँमेच्योर नॅटबाॅल असोसिएशनने राज्यात नेटबाॅल संघाची निवड केली. या निवडीत कर्नाटक राज्य नेटबाॅल संघात सिटी निवड झाली.कर्नाटक राज्यातील अनेक प्रतिभावंत १९ वर्षाखालील नेटबाॅल खेळाडु उपस्थित होते.
मात्र खानापूर समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची अदिती डी.नाडगौडा ही केवळ १२ वर्षाची खेळाडु तिच्या कौशल्याच्या जोरावर , उत्कृष्ट खेळामुळे तिची चाचण्यादरम्यान निवड झाली.
आज सोमवारी दि.२३ रोजी अदिती डी.नाडगौडा ही बेंगलोरला रवाना झाली.
यावेळी अदितीला शुभेच्छा देण्यासाठी समर्थ इंग्लिश मिडीयमचे स्कूलचे चेअरमन एफ.एम पाटील सचिव व खानापूर डाॅक्टर असोसिएशन चेअरमन डॉ डी ई नाडगौडा, संचालक डाँ.एन.एल.कदम,प्राचार्य व कोच बाळकृष्ण हलगेकर, अँडमिन सौ.दिव्या नाडगौडा.श्री नरोना व शिक्षकवर्ग उपस्थित होते
आदिती ही १० दिवसासाठी दि. २८ मार्च दरम्यान उत्तर प्रदेशातील मेरठा येथे होणार्या १९ वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय नेटबाॅल संघाचे कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
देशभरातील २७ राज्याचे नेटबाॅल संघ या १९ वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेत भाग घेणार आहेत.
अदिती डी.नाडगौडा हिने मिळविलेल्या य़शाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अदिती डी नाडगौडा ही खानापूर डाँक्टर असोसिएशन चेअरमन व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे सचिव डाॅ. डी.ई.नाडगौडा व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अँडमिन सौ दिव्या डी.नाडगौडा यांची कन्या होय.
