संदेश क्रांती न्युज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वाहन धारकाना वाहने चालविणे तारेवरची कसरत होत.त्यामुळे वाहन धारकाना तसेच प्रवाशाना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तोपिनकट्टी ते लोकोळी क्राॅस पर्यतच्या रस्त्यावर ही जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यांचा त्रास चुकविण्यासाठी तो तोपिनकट्टी गावचे वाहन चालक चरणदास मुरगोड यानी स्वत: आपल्या वाहवातुन खडी आणुन तोपिनकट्टी ते लोकोळी क्राॅसपर्यतच्या रस्त्यावरील खड्डे श्रमदानातुव बुजवुन एक सामाजिक आदर्श दाखवुन दिला.
सरकारच्या निधीची प्रतिक्षा करत बसण्यापेक्षा श्रमदानातुन खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करणारे वाहन धारक केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात.
त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करावे तितके कमीच!
